श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ज्ञानसागरातील मोती कै. गोपालबाबांनी प्रकाशित ग्रंथाचे अध्याय व पान क्रमांक संदर्भ आहेत. ह.भ.प. हरिभाऊ निटूरकरांच्या प्रतीचे नाहीत. ज्ञान सागरातील मोती कथनातून विविध विषयांची माहिती व उपदेश सिद्ध योगी शंकर भटांना श्रीपादांचा महिमा उपदेशताना अ.2 पान 7 सृष्टीमधे प्रत्येक पदार्थाला स्पंदन होत असते. भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ति व्यक्तीमधे आकर्षण तर काहीं मधे विकर्षण होते. पुण्य कर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल , सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी संचय होतो. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तिचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थलांचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापाचा नाश होतो. या सर्वांचे फल स्वरूप म्हणून श्री दत्त प्रभूंवर भक्ति जडते. अरे बाबा, शंकर भट्टा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास. *कणाद महर्षींचा कण सिद्धांत विषद करतात - पलनी स्वामी अ. 3. पान 14. समस्त सृष्टी परम मूल अशा अणूंन...
Comments
Post a Comment